महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत खरेदीदार-विक्रेता संमेलन 19 मार्चला 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा :
कृषि महोत्सवाच्या दरम्यान रविवार 19 मार्च रोजी दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा येथे सकाळी 11.00 वाजता खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजीत केले आहे. तरी या संमेलनाला खरेदीदार व विक्रेता शेतकरी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अर्चना कडू यांनी केले आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत जिल्हातील सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना चालना देवुन त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2020-21 पासुन राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भांडवली गुंतवणुक, सामाईक पायाभूत सुविधा, मार्केटिंग व ब्रान्डींग, बीज भांडवल या माध्यमातून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने यामध्ये शेतकऱ्यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. याचे औचित्य साधुन PMFME योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या अन्न प्रक्रीया उत्पादनांची ओळख जिल्हातील इतर खरेदीदार व ग्राहक यांना होण्यासाठी त्यांचे उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्याकरीता तसेच ड्रोनचे प्रात्यक्षिका करीता त्याचा लाभ अन्न प्रक्रीया उत्पादकांसह विविध खरेदीदारांनी व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.    

 सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना, खरेदीदार व विक्रेत्यांमध्ये परस्पर विश्वास, उत्पादनांबद्दल जाणीव, Memorandom of Understanding (MoU) च्या माध्यमातुन व्यवसायीक हितसंबंध निर्माण करुन सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांच्या उत्पादनांना विक्रीसाठी नवीन संधी उपलब्ध होणे हा खरेदीदार-विक्रेता संमेलनाचा (Buyar-Sellar meet) मुख्य उद्देश आहे. यानुषंगाने विक्रेत्यांची उत्पादने थेट खरेदीदारांसाठी प्रदर्शित करण्यास मदत होणार असुन खरेदीदार व विक्रेते यांना खुली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तरी खरेदीदार-विक्रेता संमेलनाचा लाभ जास्तीत जास्त खरेदीदारांना व PMFME योजनेंतर्गत लाभार्थी विक्रेत्यांनी घ्यावा.





  Print






News - Bhandara




Related Photos