महत्वाच्या बातम्या

 महिला दिनानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : उत्तर भारतीय चंद्रपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले.

उत्तर भारतीय चंद्रपूर भाजपा महिला मोर्चाद्वारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे चंद्रपूर उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी व उत्तर भारतीय महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीमती वंदना सिन्हा यांच्या अथक परिश्रमाने वन विकास महमंडळ चे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर जवळील मुख्य मार्गावर असलेल्या वृद्धाश्रमात जागतिक महिला दिनानिमित्त आई -वडील यांसारख्या ज्येष्ठांना अन्नदान करण्यात आले आणि त्यासोबतच सर्व नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत भोजनही केले. या शुभप्रसंगी भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, चंद्रपूर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा अलका आत्राम, श्रीमती किरण बुटले, अजहर शेख व भाजपा व उत्तर भारतीय मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos