महत्वाच्या बातम्या

 संघ परिवाराचा कोजागिरी निमित्य बौद्धिक मार्गदर्शन कार्यक्रम


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : स्वयंसेवक संघाच्या आष्टी येथील श्रीराम शाखा तर्फे शुक्रवार ला संघ परिवाराचा कोजागिरी उत्सव व्यंकटेश राईस मिल मध्ये घेण्यात आला. सायंकाळी ७.०० वाजता संघ परिवाराचे आगमन झाले. त्यावेळी तुलसी भजन मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यांनतर ८.०० वाजता संघ परिवाराला बौद्धिक मार्गदर्शन करण्यात आले. या बौद्धिक कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हेमेंद्र दामोदरे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून नीलकंठ बाबुराव कोहळे, जिल्हा प्रचारक सागरजी अहेर हे होते.                                                
याप्रसंगी बोलतांना नीलकंठ कोहळे म्हणाले आपल्या संस्कृतीमध्ये परीवार महत्वाचा घटक आहे. परिवारामध्ये ६० टक्के स्त्रियांचा सहभाग पुरुषासोबत काम करतांना असतो. स्त्री ही पुरुषांच्या व्यवहारात हातभार लावते. मार्केटिंग कंपनी आपली मानसिकता बदलवीत आहे. जुन्या संस्कृती ला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नये.
प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना सागरजी म्हणाले संघामध्ये चांगल्या विचारांची शिकवण दिली जाते. संघाचा विस्तार भारतातच नाही तर विदेशातही झाला आहे. संघ हा परिवाराला जोडण्याचे काम करतो संघ व्यक्ती घडविण्याचे काम करतो. २०२५ मध्ये संघाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे संघाचा विस्तार अजून वाढविण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या नंतर संघपरिवाराचा स्नेहभोजन झाले व कोजागिरी चे दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. भारत पांडे यांनी केले. या कार्यक्रमाला संघपरिवाराच्या महिला व पुरुष मिळून २५० जण उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos