बॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर


- सोनेगाव आबाजी येथील घटनास्थळी भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा  :
  सोनेगाव आबाजी येथील डिमोलेशन डेपो मध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणाचे पाहणी आज गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केली. यावेळी खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी आणि पुलगाव दारुगोळा भांडार येथील अधिका-यांकडुन घटनेची  माहिती घेतली. जुने बॉम्ब नष्ट करतांना सुरक्षिततेच्या दृष्टिीकोनातुन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना ना अहिर यांनी संबंधित अधिका-यांना दिल्यात. 
बॉम्ब नष्ट करतांना आजुबाजुच्या गावांना हादरा बसतेा यासाठी एकावेळी नष्ट करण्यात येणा-या बॉम्बची संख्या कमी करावी. असे त्यांनी सागितले. परराज्यातुन बॉम्ब आणतांना काय काळजी घेतली जाते, वाहतुक कशाने केली जाते याबद्दल त्यांनी चौकशी केली. तसेच हे बॉम्ब त्याचठिकाणी का नष्ट केले जात नाहीत, अशी विचारणा केली असता खमरिया येथील अधिका-याने जबलपुर येथील जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच डिमोलेशन डेपोमध्ये प्रवेश देतांना गावक-यांची पडताळणी केली जात नाही का असा प्रश्नही यावेळी श्री. अहिर यांनी उपस्थित केला. तसेच बॉम्ब नष्ट करण्यासाठी सुरक्षिततेचे कोणते नियम पाळण्यात येतात. मजुरांना प्रशिक्षण दिले जाते किंवा नाही. आदी बाबींची चौकशी त्यांनी केली.  या घटनेसंदर्भातील चौकशी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी पुलगाव आणि खमरिया येथील अधिका-यांना दिलेत. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-11-22


Related Photos