महत्वाच्या बातम्या

 मुलचेरा येथे दोन दिवशीय बुद्धयांक तपासणी व निदान शिबीराचे आयोजन


- जिल्हा सामान्य रूग्णालय व मित्र फांऊडेशनचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : जिल्हा परिषद समावेशीत शिक्षण समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील गट साधन केंद्र मुलचेरा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विवेकानंदुर, गांधीनगर, आबटपल्ली, लगाम येथे चारही केंद्रातील विद्यार्थ्यांची ६, ७ फेब्रुवारी २०२३ रोजी बुद्ध्यांक तपासणी व निदान शिबिर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

करिता संसाधन शिक्षक व विशेष तंज्ञ गट साधन केंद्र मुलचेरा यांच्या द्वारे निवड झालेल्या तसेच तालुक्यातील इतर प्रमाणित नसलेले मतीमंद प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर शिबीरात उपस्थित ठेवण्याचे आव्हान गट विकास अधिकारी पंचायत समिती मुलचेरा यांनी सबंधीत शाळेच्या मु.अ.शिक्षक, पालकांना केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos