ताडोब्याच्या कोअर व बफरच्या सीमेवर अर्जुनी-कोकेवाडा गावालगत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  ताडोब्याच्या कोअर व बफरच्या सीमेवर असलेल्या अर्जुनी-कोकेवाडा या गावालगत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. तुळसाबाई किसन केदार (६२), असे मृत महिलेचे नाव असून चालू वर्षातील ही अठरावा बळी ठरला आहे. सततच्या या घटनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. 
वरोरा तालुक्यातील अर्जुनी-कोकेवाडा येथे शनिवारी संध्याकाळी तुळसाबाई किसन केदार (६२) ही महिला जंगलामध्ये असलेले हनुमान मंदिरात पूजा करण्याकरिता गेली होती. तेथून गावाकडे परतत असताना स्वयंपाकासाठी थोड्या काड्या जमा करण्यासाठी जंगलात गेली होती. तेव्हा तेथेच दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला. तिला ठार केले. तिच्यासोबत असलेला व्यक्ती त्या घटनेने घाबरला. त्याने गावात येऊन घटनेबद्दल माहिती दिली. गावकरी घटनास्थळी गेले असता तिथे महिला आढळली नाही. त्यानंतर नातेवाइक, गावकऱ्यांनी शोधाशोध केली. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. पण, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला निराधार असून तिच्यामागे नातवंड असल्याची माहिती आहे. शवविच्छेदन वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले. 

दहा महिन्यांत १८ बळी 

चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्या घटनेतील ही अठरावी आहे. यात तेरा बळी वाघाच्या, तीन बळी बिबट्याच्या तर प्रत्येकी एक बळी अस्वल व रानडुकराच्या हल्ल्यात गेला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भागात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांनी जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-05


Related Photos