महत्वाच्या बातम्या

  क्रॉसबो शूटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला ११ पदके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : ऑल इंडिया क्रॉसबो शूटिंग स्पर्धा १९ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३ ला एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियम आग्रा, उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडली. द्वितीय संसद खेल स्पर्धा केंद्र शासनातर्फे आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये महाराष्ट्रा सहित सात राज्यांनी सहभाग दिला ज्यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा अशा राज्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत तीन गोल्ड मेडल, पाच सिल्वर मेडल आणि तीन ब्रोन्झ मेडल जिंकले. महाराष्ट्र क्रॉसबो शूटिंगचे सचिव संजय पारधी, बालाजी हायस्कूलची सहाव्या वर्गाची खेळाडू पारुल पचारे तसेच अकोला जिल्ह्यातील खेळाडू निर्मल नरवडे यांनी गोल्ड मेडल जिंकले. तसेच महाराष्ट्र क्रॉसबो शूटिंगच्या अध्यक्षा प्रीती निधेकर, क्रिसेंट पब्लिक स्कूलची वर्ग सातवीची विद्यार्थिनी समृद्धी कुक्रेजा, नितीन निवलकर, वर्ग सातवीची श्रुतिका कोसरे अहेरी, गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आहे आणि नीमू निवलकर यांनी सिल्वर मेडल जिंकले. तेजस्विनी येगिनवार, दिलासा ग्राम कॉन्व्हेंटची सातव्या वर्गाची खेळाडू सौंदर्या वेले आणि विद्याश्री कॉन्व्हेंटची आठव्या वर्गाची खेळाडू भार्गवी कायरकर यांनी ब्रोन्झ मेडल जिंकले. अशा प्रकारे द्वितीय संसद खेल स्पर्धा जी एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राने कंपाऊंड रीकर्व्ह कॅटेगरीमध्ये ११  पदके जिंकली. बल्लारपूर शहरात एखाद्या खेळामध्ये गोल्ड, सिल्वर, ब्रोन्झ तीनही प्रकारचे पदक जिंकण्याचा हा पहिलाच मान मिळालेला आहे. त्यामुळे सर्वत्र खेळाडूंना कौतुकाची थाप दिली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos