महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (२० जानेवारी )

२० जानेवारी १७८८ : इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.

२० जानेवारी १८४१ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

२० जानेवारी १९३७ : फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.

२० जानेवारी १९४४ : दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.

२० जानेवारी १९४८ : महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला.

२० जानेवारी १९५७ : आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

२० जानेवारी १९६३ : चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.

२० जानेवारी १९६९ : क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.

२० जानेवारी १९९८ : संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.

२० जानेवारी 1999: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

२० जानेवारी २००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

जन्म (२० जानेवारी )

२० जानेवारी १७७५ : फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अॅम्पियर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १८३६)

२० जानेवारी १८६१ : मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.

२० जानेवारी १८७१ : टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)

२० जानेवारी १८८९ : महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.

२० जानेवारी १८९८ : नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)

२० जानेवारी १९३० : चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.

२० जानेवारी १९६० : १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.

मृत्यू (२० जानेवारी )

२० जानेवारी १८९१ : हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)

२० जानेवारी १९३६ : युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन. (जन्म: ३ जून १८६५)

२० जानेवारी १९५१ : समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)

२० जानेवारी १९८० : दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)

२० जानेवारी १९८८ : स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

२० जानेवारी १९९३ : अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)

२० जानेवारी २००२ : रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos