महत्वाच्या बातम्या

 विषप्राशन केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू


- खमारी येथील ४५ वर्षीय प्रल्हाद उईके यांचा मृत्यू; ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खमारी येथे विषप्राशन केलेल्या ४५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ८ घडली. प्रल्हाद सोहनलाल उईके ४५ वर्षे, रा. खमारी असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद उईके यांनी २१ जुलै रोजी विषप्राशन केले होते. विषप्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रल्हाद उईके यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर शनिवारी ८ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची परिस्थिती आणि मृत्यूशी संबंधित बाबींचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos