महत्वाच्या बातम्या

 निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे तर्फे रानभाज्या महोत्सव व संवर्धन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक डॉ. कैलास वि.निखाडे यांच्या संकल्पनेतून राजे विश्वेशराव कला व वाणिज्य महाविद्यालय, भामरागड आणि राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रानभाज्या महोत्सव व संवर्धन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कैलास विठ्ठलराव निखाडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी रानभाज्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, उपयोग आणि त्यांचा आहारात कसा समावेश करावा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. संतोष डाखरे यांनी रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करून रानभाज्यांचे आपल्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी लोककवी दादाजी कुसराम यांनी रानभाज्यांमधील औषधी गुणधर्मांची माहिती विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांद्वारे पटवून दिली. प्रभारी मुख्याध्यापक खंडारकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आहारात रानभाज्यांचा वापर करावा असे आवाहन केले. तसेच प्राध्यापिका गावंडे मॅडम यांनी विविध रानभाज्यांची ओळख करून देत त्यांच्या वापराविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास उपस्थित डॉ. सुरेश डोहाने यांनी परिसरात विपुल प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सध्या अनेक दुर्मिळ रानभाज्या लुप्त होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून आरोग्यासाठी त्यांचा आहारात नियमित समावेश करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.विनायक मोरांडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडू बोंडे, सुनील ताजने यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोलाचे परिश्रम घेतले. या महोत्सवाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती





  Print






News - Gadchiroli




Related Photos