शेतातून परतताना शेतकऱ्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरेगाव : शेतातील काम आटोपून सायकलने घराकडे परतत असताना वाटेत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देसाईगंज तालुक्यातील चोप येथे शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता घडली. आनंदराव सदाशीव पिलारे ६५, वर्ष रा. कोरेगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव पिलारे हे शनिवारी दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान सायकलने डोंगरमेंढा येथील स्वतःच्या शेतात गेले होते. शेताची पाहणी करून ते सायकलने कोरेगावकडे परतत असताना चोप येथील अरुण राजगिरे यांच्या शेतालगत रस्त्याच्या कडेला सायकलसह अचानक खाली कोसळले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




