भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड केअर वार्डात ऑक्सिजन पाईप लिकेज झाल्याने स्फोट


- सुदैवाने जीवितहानी नाही 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
दहा निष्पाप बालकांचे आगीत बळी गेलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन कोविड केअर वार्डात शुक्रवारी रात्री ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपला लिकेज होऊन स्फोट झाला. सुदैवाने हा प्रकार लक्षात येताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामुळे रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी सुरू झालेल्या या वार्डात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सेंट्रल पाईप लाईन तयार करण्यात आली. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या ऑक्सिजन सिलिंडर लावताना पाईपमध्ये लिकेज होऊन स्पार्क झाला. काही कळायाच्या आता स्फोट होऊन पाईपला आग लागली. संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने वार्डातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले आणि आग विझविण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डोॅ. रियाज फारूकी आणि पथकाने ताबडतोब कारवाई करून परिस्थितीती नियंत्रणात आणली.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डोॅ. रियाज फारूकी विचरणा केली असता कोणतीही हानी झाली नाही. सर्व रुग्ण सुरक्षित असून पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली असून सेंट्रलाईज ऑक्सिजन पुरवठा रविवारी दुपारपर्यंत सुरळीत होईल असे सांगितले.
गत जानेवारी महिन्यात येथील शिशू केअर युनीटला आग लागून दहा निष्पाप बालकांचा बळी गेला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. आत शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.
  Print


News - Bhandara | Posted : 2021-04-03


Related Photos