महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३१ जुलै महत्वाच्या घटना

१४९८ : पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

१६५७ : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

१६५८ : औरंगजेब मुघल सम्राट बनला.

१८५६ : न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.

१९३७ : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.

१९५४ : इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.

१९५६ : कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.

१९६४ : रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

१९९२ : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.Holidays & Seasonal Events

१९९२ : सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

२००० : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.

२००१ : दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.

२००६ : फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.

२०१२ : मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

२०२२ : अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी, यांचा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार.Time & Calendars

३१ जुलै जन्म

१७०४ : स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)

१८०० : जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)

१८७२ : संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)

१८८० : हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १९३६)

१८८६ : अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)

१९०२ : व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)

१९०७ : प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)

१९१२ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)

१९१८ : संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)

१९१९ : भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

१९४१ : गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)

१९४७ : हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.

१९५४ : भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)

१९६५ : हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.Geographic Reference

१९९२ : आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.

१९४२ : भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऍटलास रामचंद्रन यांचा जन्म (मृत्यू : २ ऑक्टोबर २०२२)

१९२३ : अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचा जन्म (मृत्यू : १४ डिसेंबर २००६)

३१ जुलै मृत्यू

१७५० : पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)

१८०५ : भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५)

१८६५ : आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

१८७५ : अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८)

१९४० : भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१९६८ : चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)

१९८० : पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)Time & Calendars

२०१४ : भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)

२०२२ : अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी अयमान अल-जवाहिरी यांचे निधन (जन्म: १९ जून १९५५)

१९७२ : बेल्जियम देशाचे ४६वे पंतप्रधान पॉल-हेन्री स्पाक यांचे निधन (जन्म: २५ जानेवारी १८९९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos