महत्वाच्या बातम्या

 आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बामणीत भव्य रक्तदान शिबिर : ६४ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त बामणी येथे गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत तब्बल ६४ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशाला प्रतिसाद देत युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिर यशस्वी ठरले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर, उपाध्यक्ष देबाशिश सिंग, तालुका महामंत्री रूमदेव देरकर, प्रकाश मुडपल्लीवार, अंकित ढवस, ओम कामडे, महेश तुराणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत समाजहितासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रक्तदाते, आयोजक, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमांमधून गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास हातभार लागतो, त्यामुळे प्रत्येकाने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला बामणी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






News -




Related Photos