अज्ञात वाहनाच्या धडकेत मध्यप्रदेशातील मजुराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर–मूल मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मध्यप्रदेशातील एका तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी २३ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सावंगी येथील खीलेश मानसिंग पटले २२ वर्ष हा आपल्या सहकाऱ्यांसह चिचपल्ली येथील शासकीय रुग्णालयात प्लंबिंगचे काम करण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तो कोणालाही न सांगता बाहेर गेला. त्यानंतर चिचपल्ली बसस्थानक चौकातील महाराष्ट्र बँकेसमोर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात खीलेश गंभीर जखमी झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र या घटनेप्रकरणी बालाघाट जिल्ह्यातील सावंगी येथील ठेकेदार संदेश पारधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




