महत्वाच्या बातम्या

 जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा लिलाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील न्यायालयाच्या निर्देशानुसार जमीन महसूलाची वसुली करण्यासाठी विजयगोपाल येथील जमीनीची लिलावाद्वारे विक्री करावयाची आहे. त्यासाठी २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, विजयगोपाल येथे जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. खरेदीदारांनी लिलावापूर्वी अनामत रक्कम भरून लिलावात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फौजदारी किरकोळ अर्ज ०४/२०२३ प्रियंका विरुध्द योगेश कलम १२५ (३) मध्ये दर्यापूर न्यायालयाचच्या निर्देशानुसार योगेश नारायण डगवार यांच्याकडील जमिन महसूलाची थकबाकी म्हणुन ९ लाख ५१ हजार रुपये इतकी भरपाई म्हणुन देणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांच्या मालकीचे विजगोपाल येथील शेत सर्व्हे क्रमांक ४८६/१ आराजी १.३९ हेक्टर आर या मालमत्तेची विक्री करुन वसुली करण्यात येणार आहे. सदर मालकमत्तेची विक्री करुन वसुल करण्यासाठी ग्रामपंचायत, विजयगोपाल येथे २० ऑगस्ट  रोजी दुपारी १२ वाजता लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मालमत्तेची अपसेट किंमत ७ लाख ९२ हजार ७०३ रुपये आहे. ही किंमत मालमत्तेच्या मुल्यांकनाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांना मालमत्ता लिलावाद्वारे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी लिलावाच्या दिनांकापुर्वी अनामत रक्कम अपर तहसिल कार्यालय, पुलगाव येथे जमा करावी, असे अपर तहसिलदार पुलगाव यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos