महत्वाच्या बातम्या

 जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार.३० जुन रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, प्रताप वाघमारे, श्रीपती मोरे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत आल्यावर एक दिवस सेवानिवृत्त व्हावे लागते. परंतु शासन सेवेत असतांना त्यांनी केलेल्या कामाची पावती ही कायमस्वरुपी स्मरणात राहते. अनिरुध्द राजुरवार हे गेल्या तीन वर्षापासुन वर्धा येथे जिल्हा नियोजन अधिकारी पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी चांगले काम केल्याचे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या.

सत्काराला उत्तर देतांना अनिरुध्द राजुरवार म्हणाले, जिल्हा नियोजन कार्यालयातील तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कामे करतांना चांगले सहकार्य मिळाले, असे सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos