महत्वाच्या बातम्या

 अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : याशिवाय अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका पदांच्या भरतीमध्ये अंगणवाडी सेविकांना प्राधान्य देण्याऐवजी इतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात असल्याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुर्गम व नेटवर्क सुविधेअभावी त्रस्त भागांमध्ये मासिक बैठका ऑनलाइन घेण्याच्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीही यावेळी मांडण्यात आल्या.

गडचिरोली जिल्ह्यात प्रामाणिकपणे व प्रभावीपणे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता, अन्यायाची भावना आणि असंतोष याबाबत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सविस्तर चर्चा केली.

त्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,  देवरावजी चवळे तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos