महत्वाच्या बातम्या

 दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे वतीने नागपूर जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १६ ते ३० जून पर्यंतच्या कालावधीत शिक्षण मंडळाकडून आयोजित केलेल्या आहेत.

नागपूर जिल्ह्याचे ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याकरीता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मनाई आदेश जारी केले आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे आदेश ८ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर लागू राहतील.

परीक्षा केंद्राचे परीसर व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार निर्बंध लागू करुन सार्वजनिक टेलीफोन,एसटीडी,आयएसडी बुथ, फॅक्स केंद्र, झेरॉक्स सेंटर्स,ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावे. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावाणी करावी.आदेशाचे  कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन  केल्यास कायदेशीर कारवाई  करण्यात  येईल, असे आदेशात नमूद आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos