चंद्रपूर महामार्गावर दारू तस्कराला अटक : ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावर पोलिसांनी शुक्रवारी (१३ जून) सकाळी सुमारे साडेसात वाजता सापळा रचून दारू तस्करी करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत विदेशी दारू व दुचाकी असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गुड्डू दिलीप खोब्रागडे (३०, रा. सालईटोला, ता. गडचिरोली) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो अवैध विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावर सापळा रचून त्याला पकडले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७,५०० रुपये किमतीची विदेशी दारू आणि ६० हजार रुपये किमतीची दुचाकी (MH ३४ CM ४८२० जप्त केली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६७ हजार ५०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




