महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीत ऑटोमोबाइलच्या दुकानात अवैधरीत्या पेट्रोल विक्री : सिंदेवाही पोलिसांनी केली कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही :  सिंदेवाही शहरातील ऑटोमोबाइलच्या दुकानात अवैधरीत्या पेट्रोल विक्री करणाऱ्यावर सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली आहे, याप्रकरणी पोलिसांनी एकूण ४० लिटर पेट्रोल जप्त केले आहे. काही दिवसांपूर्वी सिंदेवाही शहरात व तालुक्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला होता, अनेक पंपावर पेट्रोल नसल्याने काहींनी दुसऱ्या तालुक्यात जाऊन पेट्रोल वाहनात भरले होते, या आपत्तीवर काहींनी पैसे कमविण्याची संधी तयार केली असल्याचे दिसून येतअसून या प्रकरणावरून दिसते.

सिंदेवाही शहरातील श्रीकृष्ण ऑटोमोबाईल मध्ये अवैधरित्या पेट्रोल विक्री सुरु असल्याची माहिती प्राप्त होताच पंचासह पोलीस ऑटोमोबाइलच्या दुकानात पोहोचले. शिवाजी चौकातील या दुकानाची झडती पोलिसांनी घेतली असता त्याठिकाणी एकूण ४० लिटर पेट्रोल प्लास्टिक च्या कॅन मध्ये आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी ऑटोमोबाईल चालक ४७ वर्षीय रामकृष्ण दादाजी अगळे  वर कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला, याप्रकरणी एकूण ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सदरची कारवाई सिंदेवाही पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी दादाजी रामटेके, संजय जुगनाके यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos