गडचिरोलीत भरधाव मालवाहू वाहनातून पडल्याने तरुण मॅकेनिकचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोलीत भरधाव मालवाहू वाहनातून पडल्याने एका तरुण मॅकेनिकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव समीर कालीदास बारसागडे (वय ३५, रा. काटली चेक, ता. गडचिरोली) असे आहे.
माहितीनुसार, समीर बारसागडे आपल्या शोरूममधील कचरा टाकण्यासाठी मालवाहू वाहन (एमएच-३३-टी-५७७७) ने बायपास मार्गावर गेले होते. आमगाव भागात कचरा टाकून परत येताना समीर आणि त्याचा सहकारी वाहनाच्या डाळीवर बसले होते.
घटनेवेळी वाहनाचा वेग अचानक वाढल्याने समीरचा संतुलन बिघडला आणि तो थेट डांबरी रस्त्यावर कोसळला. या अपघातात समीरचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून, चालक रोहित मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहन चालवताना विशेष खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




