महत्वाच्या बातम्या

 ग्राम पंचायत तुमनूर माल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत तुमनूर माल येथील रिक्त सदस्य पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली.  या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सक्रियपणे उतरला होता. माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ही निवडणूक लढवली.

या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती सौंदर्य दुर्गाय्या पोट्टला यांनी उल्लेखनीय विजय संपादन करत ग्राम पंचायत सदस्यपद पटकावले. त्यांच्या विजयामुळे परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, शहराध्यक्ष रवी सुलतान, शहर युवा अध्यक्ष रमेश पोट्टला, नवीन पोट्टला, दुर्गाय्या पोट्टला, अंजी दगाबाटल, विनोद गुरुसिंग, नितीन गुरुसिंग तसेच गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विजयामुळे तुमनूर माल ग्राम पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos