दुचाकी अपघातात ७१ वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा ते सेवाग्राम रस्त्यावर, चरखागृहाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एक व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव किशोर श्याम वाघमारे वय ७१, रा. सेवाग्राम असे आहे.
घटना अशी की, किशोर वाघमारे सायकलने घराकडे जात असताना एमएच ३२-एझेड ३६६८ क्रमांकाची दुचाकी चालवित असलेल्या आर्यन दीपक गवळी (रा. पवनार) यांनी त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत किशोर गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातात दुचाकीवरील आर्यन दीपक गवळी आणि त्याचा मित्रही जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असून, अपघाताची नेमकी कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.
News - Wardha




Petrol Price




