इस्रायल-इराण संघर्षाचा समुद्रावर परिणाम : होर्मुझ वाहतुकीसाठी भारत सरकारचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नव दिल्ली : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता ताज्या टोकावर पोहोचला असून, याचे परिणाम थेट समुद्रमार्गावर दिसून येऊ लागले आहेत. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक तेल वाहतुकीची नाडी मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीवर बंदी घातली आहे.
भारतीय नाविकांसाठी आणि जहाजांसाठी मोठा धोका निर्माण झाल्यामुळे भारत सरकारच्या शिपिंग डायरेक्टरेट जनरलने तातडीची सुरक्षा नियमावली जारी केली आहे.
नाविकांसाठी कडक सूचना
भारतीय नागरिक, विशेषतः इराण किंवा जवळच्या बंदरांवर असलेले लोक, शक्यतो घराबाहेर जाऊ नयेत.
संवेदनशील भागांपासून दूर राहावे.
कुठेही प्रवास करण्यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा.
जहाजांवरील खलाशांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय किनाऱ्यावर उतरू नये.
सर्व भारतीयांना सरकारच्या अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आणि कंपनीच्या प्रतिनिधींशी सतत संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दिलेल्या विशेष हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.
होर्मुझमध्ये अडकलीये जागतिक रसद -
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल टँकर्सच्या वाहतुकीवर बंदी घालल्यामुळे, आखाती देशांतून होणारा तेलपुरवठा विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत. हिजबुल्लाहनेही इशारा दिला आहे की, जर लेबनॉनला युद्धविराम करारात समाविष्ट केले नाही, तर हा करार मोडीत निघेल.
भारतीय नौदलाची तयारी -
युद्धाच्या सुरुवातीला या परिसरात भारताची २५ जहाजे उपस्थित होती, त्यापैकी ९ जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ ओलांडले आहे. भारतीय नौदल गुरुग्राममधील इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर च्या माध्यमातून या भागातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहे. हे केंद्र २८ देशांशी जोडलेले असून, जहाजांवरील हल्ल्यांची रिअल-टाइम माहिती मिळवण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज आहे.
News - World




Petrol Price




