गोंदिया : खांबी-पिंपळगाव येथे झाडाला गळफास लावून ४८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अर्जुनी-मोरगाव (गोंदिया) : तालुक्यांतर्गत येणाऱ्या खांबी-पिंपळगाव येथील मळेघाट शिवारात एका ४८ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दामोधर हरी मेश्राम (४८ वर्षे), असे मृताचे नाव असून ते खांबी-पिंपळगाव येथील रहिवासी होते.
घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, दामोधर मेश्राम हे शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मळेघाट परिसरातील शेतात गेले होते. तेथे त्यांनी एका मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने मेश्राम यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याला पाचारण केले.
व्यसनाधीनतेची चर्चा, कारण अद्याप गुलदस्त्यात -
प्राथमिक तपासात दामोधर मेश्राम यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या विवंचनेतून किंवा तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद -
या प्रकरणी विलास नानू मेश्राम (४५ वर्ष, रा. खांबी-पिंपळगाव) यांनी अर्जुनी-मोरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद** केली असून, घटनेचा पुढील तपास अर्जुनी-मोरगाव पोलीस करत आहेत.
News - Gondia




Petrol Price




