महत्वाच्या बातम्या

 गोंदिया : पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला : चारित्र्यावर संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२८) सकाळी ७ वाजताच्या सुमारास केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम पुष्पनगर (ब.) येथे घडली.

माहितीनुसार, मानकुमारी गणेश बावाली (५८) या घरासमोरील नळावर पाणी भरत असताना आरोपी गणेश वीज बावाली (७१) यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला. वादाच्या भरात संतप्त झालेला आरोपीने कुऱ्हाडीने प्रहार केला.

हल्ल्यात मानकुमारी गंभीर जखमी झाल्या असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos