महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने महारेशीम अभियानात सहभाग नोंदवावा


- जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
- ५०० रुपये भरून अभियानात सहभागाची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :  शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृध्दी आणण्यासाठी राज्य शासनाने महारेशीम अभियान ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी आर्थिक प्रगतीचे नवे शिखर गाठू शेकले. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात महारेशीम अभियान २०२६ राबविण्यात येत आहे. रेशीम उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी रेशीम संचालक, उपसंचालक, सहायक संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. महारेशीम अभियान जिल्ह्यात लोकचळवळ बनविण्याचा प्रयत्न आहे. सध्या रेशीम कोषाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असून कमी कालावधीत आणि कमी पाण्यात शेतकरी लक्षाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत.

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना मनरेगामधून १ एकर तुती लागवडीवर तीन वर्षात एकुण तुती लागवड व जोपासना, मजुरीसाठी २ लाख १२ हजार ७८४, किटक संगोपन साहित्यासाठी ३२ हजार तसेच  किटक संगोपनगृह बांधकामासाठी १ लाख ८७ हजार ४५६ असे एकुण ४ लाख ३२ हजार २४० इतके अनुदान दिल्या जाते.

सिल्क समग्र- २ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी जोड दिली जाते. या योजनेमध्ये १ एकर साठीतुती लागवड, ठिंबक सिंचन, टिनपत्राचे किटक संगोपनगृह बांधकाम, किटक संगोपन साहित्य, निर्जंतुकीकरण औषधी या बाबींवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ४ लाख ७२ हजार ५०० तर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ३ लाख ७५ हजार इतके अनुदान दिल्या जाते. तसेच सिल्क समग्र- २ योजनेंतर्गत २ एकरसाठी अनुसूचित जाती, जमातीसाठी ६ लाख ७५ हजार तर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ५ लाख ६२ हजार ५०० इतके अनुदान दिल्या जाते.

पोकरा योजनेंतर्गत १ एकर तुती लागवडीसाठी मजुरी ५४ हजार, किटक संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण औषधी साहित्यासाठी ४३ हजार ६५० तसेच टिनपत्राचे किटक संगोपनगृह बांधकामसाठी २ लाख ९२ हजार ५०० असे एकुण ३ लाख ९० हजार १५० अनुदान दिल्या जाते. महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी ३० मार्च पुर्वी नोंदणी करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, प्रशासकीय भवन, वर्धा तसेच ९८६०७६१८४६, ९८३४१३७३०९, ९३७३७३८८३४, ९१७५१२३८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड यांनी केले आहे. 





  Print






News - Wardha




Related Photos