घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न


- प्रलंबित आणि पूर्व - वाद मिळून एकूण ४२८ प्रकरणांचा निपटारा
विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : घाटंजी तालुका विधी सेवा समिती आणि दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये एकूण १,२४४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये पक्षकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणात प्रकरणांचा निपटारा झाला.
महत्वाची आकडेवारी -
एकूण निकाली प्रकरणे - घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित असलेली २११ प्रकरणे (Pending Cases) आणि वादपूर्व स्तरावरील २१७ प्रकरणे (Pre-Litigation) अशा एकूण ४२८ प्रकरणांचा दोन्ही पक्षांच्या सहमतीने निपटारा करण्यात आला.
दंड व तडजोड रक्कम - या प्रक्रियेतून एकूण ४ लाख ७९ हजार १०० रुपये तडजोड/दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
कौटुंबिक सलोखा - लोक अदालतीचे मुख्य यश म्हणजे अनेक वर्षांपासून विलग राहिलेले दोन जोडपे पुन्हा एकत्र आले. वकीलांच्या आणि न्यायालयाच्या मध्यस्थीमुळे मंदा शेंडे विरुद्ध किशोर शेंडे आणि ममता बोंडे विरुद्ध रवींद्र बोंडे या दोन प्रकरणांत पती - पत्नीने आपापसातील हेवे - दावे विसरून पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.
आयोजन आणि सहभाग -
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश प्रविण आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी पॅनल वर नियुक्त अँड. शुभम धुमाळ (घाटंजी), घाटंजी तालुका वकील संघाच्या अध्यक्षा नीता मनोज राठोड, सचिव वैभव महाजन सह इतर वकील मंडळी उपस्थित होते. घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक अलोणी, स्टेनो सूर्यवंशी, व लिपिक डोईजड, माळवी, कनिष्ठ लिपिक राहुल बनारसे, विजय गवारे, शिवरकर बेलीफ, शिपाई लखन आडे, वासनिक, विक्रांत उइके, तसेच MSF जवान वाल्मीक राठोड, तडवी, चव्हाण, साईनाथ पवार, आकाश, सिंधु व इतर घाटंजी न्यायालयाचे कर्मचारी, विविध बँकांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.
या वेळी, दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालत हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे, असे मत यावेळी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश प्रविण पाटील यांनी व्यक्त केले.
News - World




Petrol Price




