बाघ नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम छिपीया जवळील बाघ नदीत उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ५ सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, गंगा महेंद्र मेंढे (४०, रा. छिपीया) या बुधवारी ४ पहाटे सुमारे ५ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता गुरुवारी ५ सकाळी सुमारे ९ वाजता छिपीया गावाजवळील बाघ नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच रावणवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील प्रक्रिया करण्यात आली. गंगा मेंढे या काही काळापासून आजाराने त्रस्त होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे वासुदेव गोविंदा मेढे (६६, रा. छिपीया) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार बर्वे करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




