गोलागुडा येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता


- शोधासाठी पोलीसांचे आवाहन
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील गोलागुडा येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून तिचा शोध घेण्यासाठी भामरागड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरी दलसु होयामी (वय १९), व्यवसाय मजुरी, रा. गोलागुडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली ही युवती १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. त्यानंतर ती परत घरी आली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली; मात्र काहीही ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. ०१/२०२६ २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता युवतीचे वर्णन -
रंग गोरा-सावळा, उंची अंदाजे ५ फूट, केस काळे व कमरेखालीपर्यंत लांब. अंगात लाल रंगाचा सलवार-कुर्ता व पांढऱ्या रंगाची ओढणी तसेच पायात निळ्या रंगाची चप्पल परिधान केली होती.
सदर युवतीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ भामरागड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




