महत्वाच्या बातम्या

 वीज प्रवाहाचा जोरदार झटका लागून युवकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : तालुक्यातील चाकूर गावात वीज प्रवाहाचा जोरदार झटका लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल भस्मे (वय ३८, रा. कानकाटी) असे मृत युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमोल भस्मे हे चाकूर गावात काम करत असताना अचानक वीज प्रवाहाच्या संपर्कात आले. जोरदार झटका बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.





  Print






News - Wardha




Related Photos