जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहिद


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. श्रीनगरमधील फातेह कादल परिसरात बुधवारी सकाळीपासून सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे.  मृत दहशतवाद्यांमध्ये एक लष्कर ए तोयबाचा स्थानिक कमांडर असल्याचेही सांगण्यात येते.
फातेह कादल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. सुरक्षादलाने परिसराला घेरल्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. परंतु, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने सैन्यदलाच्या प्रत्युत्तरात ३ दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाला.    Print


News - World | Posted : 2018-10-17


Related Photos