आशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
भाजपाचे  काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
 खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख  यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात होता. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती. ३ ऑक्टोबर रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. अखेर आज अधिकृतरीत्या त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. 

   Print


News - Nagpur | Posted : 2018-10-17


Related Photos