नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे  सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंता भास्कर पदमाकर राखुंडे यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ते  सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, सिव्हिल लाईन नागपूर येथे कार्यरत होते. 
भास्कर पदमाकर राखुंडे  यांनी आपल्या   पदाचा गैरवापर करुन गैरमार्गाने अपसंपदा जमविल्याच्या आरोपाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीवरून चौकशी करण्यात  आली. चौकशी दरम्यान सदर तक्रारीत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने भास्कर पदमाकर राखुंडे यांच्या मालमत्तांची उघड चौकशी करण्यात आली.  राखुंडे यांच्याकडे   १९ ऑगस्ट १९७६   रोजी नोकरीवर लागल्यापासून ते २९ फेब्रुवारी २०१२    या कालावधी दरम्यान त्यांनी   भ्रष्ट मार्गाने २२ लाख ६९ हजार २४५  (२०.०४  टक्के) अपसंपदा जमविल्याचे  निष्पन्न झाले. तसेच नमुद अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी अर्चना भास्कर राखुंडे यांनी सहाय्य केले असल्याने त्यांचे विरूध्द् कलम १०९ भादंवि प्रमाणे  ईमामवाडा, नागपूर शहर पोलीस ठाण्यात   कलम १३(१)(ई) सह कलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ सहकलम १०९ भादंवि अन्वये आज १६  ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी भास्कर पदमाकर राखुंडे यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात येत आहे. सदर कार्यवाही    पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग नागपुर,   अपर पोलीस अधीक्षक राजेश दुध्धलवार,  यांच्या मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक  शुंभागी देशमुख , महिला पोलीस शिपाई दिप्ती मोटघरे, रेखा यादव   यांनी केली.    Print


News - Nagpur | Posted : 2018-10-16


Related Photos