मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव भुयारी मार्ग बंद : वाहतुकीत मोठा बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवडा ते वडपे रस्त्याच्या रुंदीकरणाचे महत्त्वाचे काम सुरू केले आहे. या कामामुळे खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. येत्या ९ एप्रिल २०२६ पर्यंत, म्हणजेच जवळपास चार महिने, हा मार्ग बंद राहील. यामुळे वाहतुकीत मोठा बदल झाला असून, मुख्य महामार्गावर इतर मार्गांवर वाहतूक जास्त होण्याची आणि संथ होण्याची शक्यता आहे.
रुंदीकरणामुळे कोंडी कमी होण्याची अपेक्षा -
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते भिवंडी बायपास मार्गाचे रुंदीकरण वेगाने सुरू असून, हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. माजिवडा ते वडपे दरम्यान रस्ता अरुंद असल्यामुळे तेथे वाहतूक कोंडीची समस्या कायम होती. ही कोंडी कमी करून प्रवासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. या मार्गावर मुंबई, ठाणे, भिवंडी, कळवा, कल्याण आणि नवी मुंबई येथून लाखो वाहने प्रवास करतात.
वाहतुकीत बदल – पर्यायी मार्गांचा वापर करा -
१) खारेगाव भुयारी मार्ग बंद: खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव भुयारी मार्गावर प्रवेशबंदी राहील. या वाहनांना टोलनाका, गॅमन रोड, पारसिक चौक मार्गे किंवा साकेत येथून खाडी पूल मार्गे मार्गक्रमण करावे लागेल.
२) भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने वाहतुकीसाठी बदल : मुंबई-नाशिक महामार्गावरून भिवंडी किंवा ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही खारेगाव भुयारी मार्गावर प्रवेशबंदी असेल. भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव, पारसिक चौक, गॅमन रोड मार्गे जातील, तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहने कळवा खाडी पूल मार्गे पुढे जातील.
वाहतूक बदलामुळे, नागरिकांनी संबंधित मार्गांचा वापर करण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे.
News - Rajy




Petrol Price




