उधारीच्या वादातून सहकाऱ्यांनी मजुराची दगडाने ठेचून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिखली झोपडपट्टी परिसरात उधारीच्या वादातून एका २२ वर्षीय मजुराची सहकाऱ्यांनी दगडाने डोके ठेचून हत्या केली. मृतक महेश लतेलुराम डहारे (२२), राहुल गांधीनगर, चिखली झोपडपट्टी येथील रहिवासी होते. महेश भरतवाडा येथील युवराजस्वामी आरामशीनवर काम करत होता.
बुधवारी रात्री उधारीच्या पैशांवरून महेशचे सहकारी चंद्रेश ऊर्फ राणू वर्मा (२५) आणि रितीक नंदेश्वर (२५) यांच्याशी वाद झाला. वादाबद्दल संतापलेल्या आरोपींनी महेशला एकटे गाठले, त्याच्यावर शिवीगाळ करत मारहाण केली आणि मोठ्या दगडाने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या महेशला आरोपींनी त्याच अवस्थेत सोडून फरार झाले.
दुसऱ्या दिवशी पहाटे, रक्तबंबाळ अवस्थेतील महेशला वस्तीतील लोकांनी पाहिले. तत्काळ त्याला मेयो इस्पितळात नेले गेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महेशच्या भाऊ धर्मेंद्र यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी चंद्रेश ऊर्फ राणू वर्मा याला अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपी रितीक नंदेश्वरचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
News - Nagpur




Petrol Price




