महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक शिक्षकांचे वेतन व दरमहा वेतनबील पास व्हावे यासंदर्भात चर्चा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांच्या संदर्भात लक्ष्मण लिंगालोड जिल्हा कोशागार अधिकारी गडचिरोली यांच्याशी चामोर्शी पं.स. अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या माहे नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासंदर्भात तसेच जिल्हाकोशागारातुन जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दरमहा वेतनबील पास होण्यासाठी विलंब होत असल्याबाबतच्या मुद्यावर ३ जानेवारी २०२३ मंगळवारला प्रत्यक्ष भेटून सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा कोशागार अधिकारी लक्ष्मण लिंगालोड यांनी उपस्थित शिक्षक संघटनाच्या पदाधिकारी यांना यापुढील वेतनबील जिल्हा कोशागार कार्यालयात आल्यानंतर लवकरात लवकर पास करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे आजच्या जिल्हाकोशागार कार्यालयातुन माहे नोव्हेंबर २०२२ चामोर्शी तालुक्याचे वेतनबिल पास झाले, असुन लगेच व्हाउचर नंबर सुद्धा मिळालेला आहे. तसेच आजच्या प्रत्यक्ष भेटीत माहे डिसेंबर २०२२ चे वेतन सुद्धा त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यकार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राथमिक शिक्षक संघटनांच्या जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षक-बंधु-भगिनींच्या संदर्भात, शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लावण्यात यावी, निवडश्रेणीच्या संदर्भात, प्रदिप बंडावार सर पं.स. मुलचेरा यांच्या वैद्यकीय सबबीवरील रजा संदर्भातील मुद्यांवर शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे,सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार यांच्याशी या प्रत्यक्ष भेटीत थोडक्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस आशिष धाञक, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी, देवेंद्र डोहणे, जुनी पेन्शन संघटनेचे सरचिटणीस बापु मुन्घाटे, दुर्गम शिक्षक संघटनेचे डि.एन. पिपरे, राजेश मुर्वतकर, राष्टृवादी शिक्षक संघटनेचे विनोद ब्राम्हणवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos