गोंदिया : भरधाव कारने दिली मोटारसायकलला धडक, तरुण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत डोंगरगाव येथील बसस्थानकाजवळ गुरुवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी ५:१५ वाजता एक भयंकर अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली, आणि या धडकेत मोटारसायकल चालक अभिषेक प्रदीप किरणापुरे (३७) यांचा जागीच मृत्यू झाला.
अभिषेक मोटारसायकल क्रमांक MH ३५-ET २१७४ वर देवरीहून साखरीटोला जात होते. त्यावेळी, पाठीमागून आलेल्या कारच्या चालकाने अत्यधिक वेगात व निष्काळजीपणे मोटारसायकलला धडक दिली. अपघातात अभिषेकचे घटनास्थळीच निधन झाले, तर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
अभिषेकचे कुटुंबीय, गौरव प्रदीप किरणापुरे (३४), यांनी या प्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी रविवारी (२३ नोव्हेंबर) अपघाताची नोंद केली असून, फरार कारचालकाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




