महत्वाच्या बातम्या

 हिंदुस्थानी बनावटीच्या औषधामुळे उझबेकिस्तानातील १८ मुलांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : हिंदुस्थानी औषध कंपनी मेरियन बायोटेकचे खोकल्याचे औषध सेवन केल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळून आल्याचे, उझबेकिस्तान सरकारने निवेदनात म्हटले आहे.

हे औषध मुलांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देण्यात आले असून, या औषधाचा डोस मुलांसाठी प्रमाणित डोसपेक्षा जास्त असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

गांबियामधील लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका हिंदुस्थानी औषध कंपनीवर ठेवल्यानंतर आता उझबेकिस्ताननेही 18 मुलांच्या मृत्यूप्रकरणी हिंदुस्थानी कफ सिरप कंपनीला जबाबदार धरले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या आरोग्य अधिकार्‍यांनी या औषधाची निर्मिती करणार्‍या मेरियन बायोटेकच्या परिसराची तपासणी केली.

कंपनीतून औषधाचे नमुने घेतले असून, पुढील चाचणीसाठी हे नमुने चंदीगडच्या प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत पाठवल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच हिंदुस्थानची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना 27 डिसेंबरपासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे.





  Print






News - World




Related Photos