महत्वाच्या बातम्या

 मराठा आरक्षणासाठी पुन्हा ठिय्या : सीएसएमटी परिसर ठप्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात ठिय्या देत तीन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प केली. बम, बम बंबई देखो जम गयी अशा घोषणा देत आंदोलकांनी दक्षिण मुंबईतील फोर्ट, मंत्रालय, गिरगाव, नरिमन पॉइंट परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण केली.

प्रशासनाची समजूत, आंदोलक ठाम -
पोलिसांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या ऑडिओ क्लिपद्वारे आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. सह-पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अभिनव देशमुख, डॉ. प्रवीण मुंढे यांनी समन्वयकांच्या मदतीने संवाद साधला. तरीही आंदोलक मागे हटले नाहीत.

वाहने रिव्हर्स गिअरने मार्गावर -
तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर वाहनचालकांनी रिव्हर्स गिअर टाकून मार्ग मोकळा केला. अनेक प्रवाशांना वाहने सोडून पायी प्रवास करावा लागला. बेस्ट बस, खासगी वाहनं अडकली, तर पावसामुळे अनेकांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली.

आंदोलनाचा परिणाम पुन्हा जाणवला -
सीएसएमटी ते क्रॉफर्ड मार्केट दरम्यान दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने पार्क झाली होती. रस्त्याच्या मध्यभागी आंदोलकांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत पुन्हा रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.





  Print






News - World




Related Photos