महत्वाच्या बातम्या

 जमनी व मोहाडी येथील रेशीम उद्योगाला वस्त्रोद्योग सचिवांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी /भंडारा : सचिव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग विरेंद्र सिंग, संचालक रेशीम संचालनालय प्रदिपचंद्रन व उपसचांलक रेशीम संचालनालय महेंद्र ढवळे यांनी नुकतीच जिल्हयातील रेशीम मुलभूत सुविधा केंद्र, जमनी व मोहाडी येथील भंडारा सिल्क उद्योग, प्रा ‍लि. मोहाडीच्या केंद्रास भेट दिली. या प्रसंगी जमनी येथे सुरू असलेले रेशीम प्रर्दशनी, तूती व टसर खाद्यवृक्षाचे फार्म, टसर अंडीपूंज निर्मीती, टसर कोषापासुन धागाकरण कामकाजाची माहिती रेशीम विकास अधिकारी ए. एम. ढोले यांनी सचिव व संचालक यांना माहिती दिली. जिल्हयातील महिला बचत गटांना प्रशिक्षण व अल्पदरात एमआरटीएम मशीन उपलब्ध करून रिलींग क्षेत्राचा विकास करावा, जेणेकरून पुढील साखळी विकसीत होऊन राज्यात तयार झालेल्या कोषांचा पुर्णत: राज्यातच वापर होऊन मुल्यवृधी होईल तसेच गावागावात समुह पध्दतीने तुती लागवड करून रेशीम उद्योग करावा असे सचिव विरेंद्र  सिंग यांनी सुचविले. घटत्या जंगलामुळे तथा व्याघ्र प्रकल्पामुळे टसर रेशीम उद्योग अडचणीत असल्याची भावना व्यक्त करून रेशिम उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे प्रदिपचंद्रन यांनी सांगितले. जिल्हयातील टसर कोष लाभार्थी कोष उत्पादन करीत असलेले परंपरागत जंगल इतर प्रकल्पांना जाऊ नये तसेच टसर कोषाचे शासकीय दरात वाढ करणेचे व विविध उपाययोजनांच्या माध्यमातून टसर रेशीम उद्योगाचा विकास करणे हे संचालनालयाचे ध्येय आहे असे सिंग यांनी यावेळी आश्वस्त केले. टसर रेशीम उद्योग हा जंगलाचे संरक्षण करून टसर रेशीम अळी व कोषाचे उत्पादन जैव वैधतेचे संरक्षण करणेचे काम करण्यात येत आहे. टसर रेशीम उद्योग वाढीसाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, असेही सचिव सिंग म्हणाले. त्यानंतर मोहाडी येथील भंडारा सिल्क उद्योग, प्रा ‍लि. मोहाडी येथील अँटोमॅटीक रिलींग केंद्रावर सुरू असलेल्या तुती धागाकरण व टसर कापड निर्मीतीची पाहणी करून प्रशंसा केली. व या पध्दतीचे आणखी उद्योग जिल्हयात नव्याने उभे राहावे असे आवाहन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos