१५ हजार रूपयांची लाच स्विकारल्याने तत्कालीन तलाठयाला २ वर्ष सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंडाची शिक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : 
सातबारामधील चुकीचे नाव दुरूस्त करण्याकरीता १५ हजार रूपयांची लाच स्वीकारल्याने वर्धा जिल्हयातील धानोरा येथील तत्कालीन तलाठयावर एसीबीने करावाई केली आहे. रामदास मधुकर ठाकरे असे लाचखोर तत्कालीन तलाठयाचे नाव आहे.
तक्रारदाराच्या पतीच्या नावे असलेल्या शेतीच्या सातबारामध्ये नाव चुकीचे असल्याने ते दुरूस्त करण्याकरिता धानोरा येथील तत्कालीन तलाठी रामदास ठाकरे यांनी तक्रारदारास १५ हजार रूपये लाचेची मागणी केली व स्वीकारली असता आरोपी तत्कालीन तलाठी रामदास ठाकरेवर पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करून सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले.
सदर प्रकरणाची आज १६ ऑक्टोबर रोजी सुनावनी झाली असता सत्र न्यायालय हिंगणघाट यांनी आरोपी रामदास मधुकर ठाकरे यांना २  वर्ष सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्हयाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या तत्कालीन पोलिस उपअधिक्षक श्रीमती देवकी उईके यांनी मुदतीत पुर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारी अभियोक्ता प्रसाद सोईतकर यांनी शासनातर्फे न्यायालयात बाजु मांडली, त्यांना पैरवी अधिकारी नोपोकाॅ विजय उपासे व प्रशांत वैद्य लाचलुपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांनी सहकार्य केले.
नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर यांनी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी कर्मचारी किंवा यांचेवतीने कोणी खासगी इसम लाचेची मागणी करत असल्यास अॅन्टी करप्श्न ब्युरो कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

 
  Print


News - Wardha | Posted : 2020-10-16


Related Photos