आष्टीजवळ ट्रकची बसला समोरासमोर धडक, जिवितहाणी टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
अहेरी आगाराची चंद्रपूर - अहेरी बस चंद्रपूरकडे जात असताना आष्टी येथील वनउपज तपासणी नाक्यानंतर बसला ट्रकने समोरासमोर धडक दिल्याची घटना आज ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
बस क्रमांक एमएच ४० एक्स ६३९५ ही अहेरी येथून चंद्रपूरकडे जात होती. ही बस रामु शंकर कोडमेलवार (४०) रा. घुग्घुस हे चालवित होते. बस आष्टी येथील नाका पार केल्यापंतर सिजी ०८ वाय ८५५८ क्रमांकाच्या ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचालक धर्मराज साहु रा. बहादूर ता. खैरागड जि. राजनांदगाव असे आहे. आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनात संघरक्षित फुलझेले, संजय गोंगले, कैलास गेडाम, अंबादास खेडकर करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-07


Related Photos