महत्वाच्या बातम्या

 जिल्हयातील नागरिकांकडुन ६८ बंदुका व १२ बॅरल गडचिरोली पोलीसांच्या स्वाधिन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्रात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असतात. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास धोका होवु नये, याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतुन नक्षलवाद्यांच्या ०२ डिसेंबर २०२२ ते ०८ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या पिएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात असे, आवाहन करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हयातील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या ६८ भरमार बंदुका व १२ बॅरल पोलीस दलाच्या स्वाधिन केल्या असुन, डिसेंबर-२०२२ मध्ये उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा २० भरमार, उपपोस्टे रेपनपल्ली ०५ भरमार, पोस्टे जिमलगट्टा ०२, उपविभाग अहेरी अंतर्गंत उपपोस्टे पेरमिली १५ भरमार व ०३ बॅरल, पोस्टे मुलचेरा ०२ भरमार, उपपोस्टे राजाराम (खां.) १२ भरमार व ९ बॅरल, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत ०८ भरमार, पोमके गोडलवाही ०४ भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहेत. सदर भरमार बंदुका जमा केल्यामुळे नक्षलवादी जे सामान्य नागरिकांच्या चळवळीसाठी वापर करत होते व सोबत भरमार बंदुका बाळगल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होता, त्यास आळा बसलेला आहे. 

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर कामगिरी करीता परिश्रम घेणा­ऱ्या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असुन, जिल्हयातील आणखी काही नागरिकांकडे भरमार बंदुका असल्यास त्यांनी आपले जवळचे पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र येथे स्वाधिन करावे, असे जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता (प्रशासन), अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा, अहेरी, पेंढरी कॅम्प कारवाफा तसेच या उपविभागातील तसेच सर्व पोस्टे, उपपोस्टे, पोमके येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos