महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात गोवर रूबेला लसीकरणासाठी विशेष मोहीम


- पहिले फेरी 15 ते 25 डिसेंबर 2022 व दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023
- लसीकरण करून घेण्याचे  जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्यात गोवरचा उद्रेक वाढत असून गोवरमुळे बालकांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात गोवरचा उद्रेक वाढू नये याकरिता विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहीम जिल्ह्यात दोन फेरीमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत तर दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत असणार आहे.
भंडारा जिल्ह्यात हा उद्रेक रोखण्याकरिता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिक्षक, गटशिक्षण अधिकारी व नगर परिषद विभागाचा दूरदृष्यप्रणाली द्वारे आढावा घेतला.
या मोहिमेमध्ये 9 महिने ते 5 वर्षांपर्यंतचे बालके वंचित राहू नये. तसेच कुपोषीत बालकांची विशेष काळजी घेण्यात यावी याकडे विशेष लक्ष द्यावे. तालुका व गावांमध्ये आशाताई, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनीधी व सरपंच यांच्या मार्फत तसेच जिल्ह्यातील खाजगी दवाखाने यांच्या मार्फत जनजागृती करावी. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये. पालकांनी बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्ह्यात आतापर्यंत गोवर रूबेलाचा पहिल्या डोज 11 हजार 716 बालकांना तर दुसरा डोज 9 हजार 693 बालकांना देण्यात आला आहे. लसीकरण गोवर प्रतिबंध करिता दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात येत असून यामध्ये ताप पुरळ सर्वेक्षण, विशेष लसिकरण मोहीम, विभागीय शीघ्र प्रतिसाद पथके, कुपोषित मुलांची विशेष काळजी, प्रयोगशाळा जाळ्याचा विस्तार, सामाजिक प्रबोधन आणि लोकसहभाग, आंतरविभागीय समन्वय, स्टँडर्स ट्रीटमेंट प्रोटोकॉल आणि संदर्भ  सेवा, डेथ ऑडीट संशोधन विषयक नियोजन व हॉट स्पॉट निश्चिती यांचा समावेश असणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos