महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात ११ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दिवाळी सण तसेच विविध सामाजिक, राजकीय व शेतकरी संघटनांकडून आंदोलने, मोर्चे होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ११ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

धानाला बोनस, दुष्काळग्रस्त यादीत जिल्ह्याचा समावेश, शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी,स्वतंत्र ओबीसी कॉलम, गोसे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आदी मागण्यांसाठी आंदोलने होण्याची शक्यता आहे.आदेशानुसार शस्त्रे, दाहक व स्फोटक पदार्थ बाळगणे, चिथावणीखोर भाषणे व घोषणाबाजी करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य, प्रेतयात्रा, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम व यात्रांच्या मिरवणुकांना नियमानुसार सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी मनाई आदेशाचे पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी निर्गमित केले आहे.





  Print






Related Photos