जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या भेटीत पावीमुरांडा प्राथमिक आरोग्य पथकातील सर्वच कर्मचारी अनुपस्थित


- अध्यक्षांनी व्यक्त केला तीव्र संताप, कारवाईचे दिले आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शनिवार, १ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाला अचानक भेट दिली असता या पथकातील सर्वच कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे कंकडालवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करीत अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अजय कंकडालवार यांनी जिल्ह परिषद अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी देत आहे. दरम्यान, आज पावीमुरांडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाला अचानक भेट दिली असता या पथकाच्या प्रवेशद्वार बंद असल्याचा प्रकार दिसून आला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता या आरोग्य पथकातील सर्वच कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे कंकडालवार यांनी तीव्र संताप व्यक्त करून गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अध्यक्षांच्या भेटीदरम्यान या आरोग्य पथकातील भोंगळ कारभार लक्षात आला असून असा प्रकार वारंवार होत असल्याचा प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे गावकऱ्यांना आरोग्य सेवेचा पुरेपूर लाभ मिळत नसल्याने आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचेही कंकडालवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून असा प्रकार यापुढे घडणार नाही, असेही कंकडालवार यांनी म्हटले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-01


Related Photos