गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला जिप बांधकाम विभागाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कंकडालवार यांनी बांधकाम विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विभागातील बांधकामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. शाळा बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, विविध शाळांच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, आरोग्य केंद्र व आरोग्य पथकातील बांधकामासंदर्भातील सविस्तर माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी अधिकाऱ्यांकडून बैठकीत जाणून घेतली. शिवाय जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील प्रस्ताविक कामाची व सुरू असलेल्या बांधकामाची माहिती जाणून घेतली. शिवाय कुठे कुठे बांधकाम करणे आवश्यक आहे याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना विचारली. जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत मोडकडीत आलेल्या शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, पशुवै़द्यकीय दवाखाना आदी इमारती व त्याकरिता आवश्यक असलेल्या निधींची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. या आढावा बैठकीला जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जिल्ह्यातील सर्व अभियंते उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-07


Related Photos