बिजापुर जिल्ह्यात चकमक : पाच नक्षलवाद्यांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बिजापुर :
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बिजापुर जिल्ह्यात झालेल्या चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांना अटक अटक करण्यात आली आहे. तसेच, चकमकीच्या ठिकाणावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठ्यासह स्फोटकं व अन्य धोकादायक वस्तू देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.
बिजापुर जिल्ह्यातील पीडिया गावातील एका जंगलात जवानांनी चकमकीनंतर भीमा लेकाम, राजू ओयाम, भीमा बाडसे, सोमलू ओयाम व शांती कलमू या नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
जिल्ह्यात डीआरजी, एसटीएफ व सीआरपीएफच्या कोब्रा बटालयीनच्या संयुक्त पथकास सावनार, मुनगा, तोडका कोरचोली आणि पीडीया गावाच्या परिसरात नक्षलींच्या शोध घेण्यास पाठवण्यात आले होते. दरम्यान, हे पथक जेव्हा पीडीया गावाच्या जंगलात होते तेव्हा अचानकपणे दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, ज्याला जवानांनी चोख प्रतित्युत्तर दिले व चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांना अटक केली. यानंतर जवानांनी परिसरात आणखी शोध मोहीम राबवली.
या अगोदर बिजापुर जिल्ह्यातच नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी पेरून ठेवलेली चार स्फोटकं हस्तगत करण्यात जवनांना यश आले होते. यामुळे नक्षलवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न फसला होता. दोन ठिकाणांहून ही स्फोटक हस्तगत करण्यात आली होती. तर, एका ठिकाणच्या स्फोटकास निकामी करत असताना स्फोट झाल्याने एक जवान जखमी झाला होता.

 
  Print


News - Rajy | Posted : 2019-12-31


Related Photos